नवी दिल्ली : टेक कंपनी चे दोन स्वस्त ट्रू वायरलेस स्टीरियो (टीडब्ल्यूएस) आजपासून ई-कॉमर्स साइट वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने आणि इयरबड्सला गेल्या महिन्यात स्मार्टफोनसह लाँच केले होते. हे इयरबड्स Environment Noise Cancellation (ENC), ३डी सराउंड साउंड मोड, दमदार बॅटरी, कनेक्टिव्हिटी, टच कंट्रोल आणि शानदार साउंड क्वालिटीसह येतात. वाचा: Micromax Airfunk 1 आणि Airfunk 1 Pro ची किंमत आणि उपलब्धता ग्राहक फ्लिपकार्टसोबतच कंपनीची अधिकृत वेबसाइट micromaxinfo.com वरुन खरेदी करू शकतात. Micromax Airfunk 1 प्रो इयरबड्सला २,४९९ रुपयात लाँच करण्यात आले आहे. तर इयरबड्सला १,२९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. Micromax Airfunk 1 Pro स्पेसिफिकेशन्स आणि फीचर ब्लॅक, ब्लू, रेड, येलो आणि व्हाइट रंगात येणारे हे इयरबड्स ब्लूटूथ वी५.२ ऑफर करतो. यात प्रत्येक बाजूला दोन अशाप्रकारे चार मायक्रोफोन मिळतात. या बड्सची फ्रीक्वेंसी २० हर्ट्ज ते २०,००० हर्ट्जच्या मध्ये आहे. हे बड्स QCC ३०४० SoC सोबत येतात. यामध्ये १३एमएम डायनॅमिक ड्राइव्ह देण्यात आले आहे. यात क्वालकॉम क्लियर वॉइस कॅप्चर (cVc) ८.० मिळेल. इयरबड्स Environment Noise Cancellation (ENC) सोबत येतात. केसच्या मदतीने याची बॅठरी ३२ तास टिकते. Micromax Airfunk 1 फीचर Micromax Airfunk 1 मध्ये एक खास सुविधा देण्यात आली आहे. यात कॉल दरम्यान तुम्हाला स्वतःचा आवाज महिला ते पुरुष मोड किंवा याउलट बदलण्याची सुविधा मिळते. हे इयरबड्स ९एमएम डायनॅमिक ड्राइव्हर पॅकसह येतात. यात ब्लूटूथ वी५.० सपोर्ट मिळेल. यात वॉइस असिस्टेंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. चार्जिंग केससह इयरबड्सला १५ तास वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mWI2QX