मुंबई- जगाच्या पाठीवर कुठेही नाही अशी ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी भक्तांना मार्गदर्शक ठरले ते संत. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालून अनेकांचे संसार आनंदाने फुलले. याच संत परंपरेमधील एक महत्वाचं नाव म्हणजे . अक्कोळ गावच्या बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. याच बाळूमामांचा महिमा दाखवणारी मालिका '' संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड गाजते आहे. येत्या विजयादशमीपासून बाळूमामांच्या चरित्राचा उत्तरार्धाचा प्रवास सुरू होणार आहे. बालपणापासून अनेकांची संकटं दूर करणाऱ्या बाळूमामांनी अक्कोळ सारख्या छोट्याश्या गावात चैतन्य फुलवलं. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली. त्यासोबतच मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. सगळ्यांच्या तोंडी 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' हाच जयघोष होता. परंतु, आता त्यापुढील कथा प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. बाळूमामांचा उत्तरार्ध देखील तरुणपणाप्रमाणे रानोमाळ फिरण्यात गेला. परंतु, तोपर्यंत बाळूमामा हे नाव सगळ्यांना परिचित झालं होतं. अनेक माणसं त्यांच्यासोबत जोडली गेली होती. हा काळ स्वातंत्रानंतरचा होता. बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झालं असलं तरी त्यांचा संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात,अंधश्रद्धा,भेदाभेद ह्या गोष्टी काही संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. लोकांना तेंव्हा एका मोठ्या आधाराची गरज होती, त्यावेळी मामा एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे सावली देणारे ठरले. बाळूमामांचं हेच कार्य विजयादशमीपासून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YL6RWy