Full Width(True/False)

जेलमध्ये ३ हजार २०० कैद्यांसोबत राहतोय आर्यन खान

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा सध्या आर्थर रोड तुरुंगात बंद आहे. आपल्या मुलाच्या चिंतेत दोघांनाही झोप लागत नाहीए. अशात काही दिवसांपूर्वी तुरुंगातून आर्यनने आपल्या आई-वडिलांशी व्हिडिओ कॉलवरून संभाषण केले. इतर कैद्यांप्रमाणेच आर्यनला सुविधा दिल्या जात असून अशी कोणतीही वेगळी सुविधा आर्यनला देण्यात आलेली नाही. कोविड- १९ नियमांनुसार तुरुंगात पाच दिवस क्वारन्टाइन राहिल्यानंतर आर्यनला इतर कैद्यांसोबत कॉमन बॅरेकमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आर्यनने आपल्या पालकांसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. आर्यन जवळपास १० मिनिटं आई- वडिलांशी बोलला. त्यांचे संभाषण सुरू असताना तुरुंगातील अधिकारी तिथे उपस्थित होते. उच्च न्यायालयाने कोविड काळात तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून दोनदा कुटुंबीयांशी संभाषण करण्याची परवानगी दिली होती. आर्थर रोड तुरुंगात सध्या ३ हजार २०० कैदी आहेत. कोविडच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुटुंबीयांना तुरुंगात जाऊन कैद्यांना भेटण्याची परवानगी नाही. ते त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात. कैद्यांना कुटुंबीयांशी १० मिनिटे बोलण्याची परवानगी आहे. वडील सुपरस्टार आहेत म्हणून आर्यनला वेगळी सुविधा देण्यात आलेली नाही. तुरुंगात फक्त ११ फोन आहेत. ज्या कैद्यांच्या घरी व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा आहे, त्यांना फक्त १० मिनिटे बोलण्याची परवानगी दिली जाते. आर्यनला ११ ऑक्टोबर रोजी तुरुंगातील कँटीनमधील जेवण खरेदी करण्यासाठी वडील शाहरुखने ४ हजार ५०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली होती. तुरुंगातील नियमांनुसार, कैद्यांना फक्त मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठविले जाऊ शकतात. ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. कोणीही यापेक्षा जास्त रक्कम पाठवू शकत नाही. आर्यन सामान्य कैद्यांप्रमाणेच तिथे राहत आहे. त्यालाही सकाळी ६ वाजता उठवले जाते आणि ७ वाजता नाश्ता दिला जातो. आर्यनवर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत, त्यामुळे त्याला इतर कैद्यांपेक्षा वेगळे नियम लागू आहेत, असे म्हटले जाऊ शकत नाही. जसे, आठवड्यात फक्त दोनदा कुटुंबीयांशी संभाषण. इतर कैद्यांप्रमाणे सकाळी ६ वाजता उठणे, फक्त १० मिनिटे व्हिडिओ कॉल, सायंकाळी बॅरेकमध्ये परतणे. शाहरुख-गौरी महिन्याभरात फक्त ४ हजार ५०० रुपये मनी ऑर्डर पाठवू शकतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lTa9Qp