Full Width(True/False)

मस्तच ! आता Google डॉक्सवर मराठीत बोलून देखील टाईप करता येणार, पाहा 'या' भन्नाट टिप्स

नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत. पूर्वी जिथे छोटी कामे करण्यासाठी अनेक तास लागायचे. आता अगदी मिनिटांत होतात. तंत्रज्ञानाने जीवन खूप सोपे केले आहे. तंत्रज्ञानावर आधारित अशाच काही भन्नाट टिप्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .ज्यात Google च्या व्हॉईस टायपिंग फीचरचा समावेश आहे. यात तुम्ही बोलून सहज टाइप करू शकता. वाचा: काही काळापूर्वीच Google ने आपल्या अॅप गुगल डॉक्स मध्ये व्हॉईस टायपिंगचे विशेष वैशिष्ट्य जोडले आहे. या अॅपमध्ये तुम्ही तुमच्या प्रादेशिक भाषेत बोलून काहीही लिहू शकता. गुगलचे हे विशेष वैशिष्ट्य तब्बल ४० वेगवेगळ्या भाषांना समर्थन देते. त्यात मराठी, हिंदी, नेपाळी, तमिळ इत्यादी अनेक भाषांचा समावेश आहे. या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही Google डॉक्सवर व्हॉईस टायपिंग करू शकता :
  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.docs.google.co ला भेट द्यावी लागेल.
  • तुम्हाला आता तुमच्या समोर स्क्रीनवर + चिन्ह दिसेल. त्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर एक नवीन रिक्त डॉक्युमेंट उघडेल.
  • आता तुम्हाला सर्वात वरच्या टूल्सच्या पर्यायावर जावे लागेल आणि व्हॉइस टायपिंग निवडावे लागेल.
  • त्यानंतर तुमची भाषा निवडा आणि माइक चिन्हावर क्लिक करून बोलणे सुरू करा.
  • तुम्ही बोललेले शब्द स्क्रीनवर लिहिले जातील.
  • आणि शेवटी, जेव्हा तुम्हाला तुमचा व्हॉईस टायपिंग थांबवायचा असेल, तुम्ही पुन्हा माईक बटण दाबून ते थांबवू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ahaAgP