नवी दिल्ली: आजकाल बरेच लोक फक्त त्यांचा नंबर चालू ठेवण्यासाठी त्यांचा फोन रिचार्ज करतात. याचे कारण म्हणजे , सध्या बहुतेक युजर्सकडे आधीपासूनच वाय-फाय आहे. घरी नसल्यास ऑफिसमध्ये वाय-फाय उपलब्ध आहे. याचाच फायदा टेलिकॉम कंपन्या घेत असून पूर्वीपेक्षा जास्त किमतीत २८ दिवस किंवा ३० दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लान देत आहेत. वाचा: Jio कंपनी ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे तीन प्लान ऑफर करत असून त्यामध्ये १०, २० आणि ५० रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. तुम्ही तुमचा Jio नंबर फक्त चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करत असाल तर हे प्लान्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. १० रुपयांचा प्लान : हा एक एक आहे. यामध्ये यूजर्सला ७.४७ रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. याची वैधता अमर्यादित आहे. यामध्ये यूजर्सना टॉक टाइम व्यतिरिक्त काहीही मिळत नाही. यामध्ये उपलब्ध असलेला टॉकटाइम इंटरनेट सेवेसाठीही वापरला जातो. २० रुपयांचा प्लान : हा देखील एक टॉप-अप प्लान आहे. या प्लानची किंमत २० रुपये आहे आणि यामध्ये यूजर्सना १४.९५ रुपयांचा टॉक-टाइम मिळतो. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड वैधता मिळते. यामध्ये इतर कोणताही लाभ दिला जात नसून यामध्ये उपलब्ध असलेला टॉकटाइम इंटरनेट सेवेसाठीही वापरला जातो. ५० रुपयांचा प्लान : इतर प्लानप्रमाणे हा देखील एक टॉप-अप प्लान आहे. यामध्ये यूजर्सना ५० रुपये देऊन ३९.३७ रुपयांचा टॉक-टाइम मिळतो. तसेच यात अनलिमिटेड वैधता उपलब्ध आहे. यामध्ये इतर कोणताही लाभ दिला जात नाही. या प्लान मध्ये उपलब्ध असलेला टॉकटाइम इंटरनेट सेवेसाठीही वापरला जातो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XOy8aa