Full Width(True/False)

Samsung Galaxy A03 Core: JioPhone Next ला टक्कर! Galaxy A03 Core कमी किमतीत लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Samsungने आपला स्वस्त एंट्री लेव्हल स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हँडसेटमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. मागील पॅनेलच्या तळाशी सॅमसंग लोगोसह सिंगल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. Samsung Galaxy A03 Core ५००० mAh बॅटरीसह सुसज्ज असून दोन रंग पर्यायांमध्ये येतो . फोनचा बॅक कॅमेरा मॉड्यूल अगदी वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. वाचा: JioPhone Next सोबत स्पर्धा : नवीन Samsung Galaxy A03 Core कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. मात्र, त्याची किंमत आणि उपलब्धतेची माहिती देण्यात आलेली नाही. पण हे स्पष्ट आहे की Samsung चा हा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन आहे, जो JioPhone Nextशी स्पर्धा करेल. Samsung Galaxy A03 Core फीचर्स : Samsung Galaxy A03 Core मध्ये ६.५ इंचाचा HD+ Infinity-V डिस्प्ले आहे. हे ऑक्टा-कोर (Quad 1.6GHz + Quad 1.2GHz) SoC द्वारे २ GB RAM सह जोडलेले आहे. फोन कोणत्या प्रोसेसरवर काम करतो याबद्दल सांगितले गेले नाही. मायक्रोएसडी कार्ड स्लॉट वापरून फोनचे स्टोरेज ३२ GB पर्यंत वाढवता येते. हे डिव्हाइस काळ्या आणि निळ्या रंगात सादर करण्यात आले आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर, Samsung Galaxy A03 Core f/2.0 अपर्चरसह ८ MP ऑटोफोकस लेन्स आणि f/2.2 अपर्चरसह ५ MP फिक्स्ड फोकस लेन्ससह येईल. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. Samsung Galaxy A03 Core मध्ये ड्युअल-सिम स्लॉट (Nano + Nano) आहे आणि तो 4G LTE कनेक्टिव्हिटीसह येतो. ऑनबोर्ड सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सरचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HBcpEK