नवी दिल्लीः जर तुम्ही रिलायन्स जिओचे () चे युजर असाल तसेच तुम्ही स्वस्त प्लानच्या शोधात असाल तर जिओकडे दोन जबरदस्त प्लान आहेत. जिओचे हे प्लान ९८ रुपये आणि १२७ रुपये किंमतीचे आहेत. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना १५ दिवसाची वैधता मिळते. डेटा मध्ये हा प्लान खास आहे, जाणून घ्या या प्लानमध्ये मिळणारे फायदे कोणकोणते आहेत. ९८ रुपयाचा प्लान, २१ जीबी डेटा आणि १४ दिवसाची वैधता १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा रिलायन्स जिओचा एकमेव प्लान आहे. ९८ रुपयाच्या या प्लानमध्ये ग्राहकांना १४ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण २१ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही. १२७ रुपयाचा प्लान, १५ दिवसाची वैधता आणि १२ जीबी डेटा रिलायन्स जिओ (Reliance Jio) च्या १२७ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना १५ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये १२ जीबी डेटा दिला जातो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या १२ जीबी डेटा मधून रोज कितीही डेटाचा वापर करता येतो. म्हणजेच यात कोणतीही लिमिट नाही. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EXxLtB