Full Width(True/False)

कंगना पुन्हा ब्रेकअप! पोस्ट पाहून अंदाज लावत आहेत चाहते

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री , जी अनेकदा चर्चेत असते, तिने यापूर्वी आपल्या प्रियकराबद्दल लवकरच लोकांना सांगणार असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून कंगना कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, याची अटकळं बांधली जात होती. आता कंगनाने सोशल मीडियावर असे काही शेअर केले, ज्यावरून तिचं ब्रेकअप झाल्याचा तुटल्याचा अंदाज बांधला जात आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीमध्ये लिहिले की, 'तेरे लिए हम है जिये...कितने सितम हम पे सनम.' या पोस्टनंतर चाहते कंगनाचे पुन्हा एकदा प्रेमभंग झाल्याचा अंदाज लावत आहेत. बरं, यात सत्य किती आहे, याबाबत कंगना अद्याप काहीही बोललेली नाही. दरम्यान, कंगना याआधी आदित्य पांचोली, अध्यायन सुमन आणि हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा 'थलायवी' सिनेमा प्रदर्शित झाला होता. याशिवाय लवकरच ती आगामी 'धाकड' आणि 'तेजस' या सिनेमांत दिसणार आहे. दोन्ही सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या दोन सिनेमांशिवाय कंगना 'मणिकर्णिका रिटर्न्स', 'सीता - द इनकारनेशन' आणि 'इमर्जन्सी' मध्येही दिसणार आहे. यासोबतच कंगना 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाची निर्मिती करत असून यामध्ये अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ती दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZA3MJc