Full Width(True/False)

मराठी चित्रपटात काम करणार का? अक्षय कुमार म्हणतो, अद्यापही...

प्रयत्न करत राहावे लॉकडाउनच्या दिवसांत माझा '' हा सिनेमा ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित झाला. त्यांनतर मध्यंतरी सिनेमागृहांत 'बेल बॉटम' प्रदर्शित झाला. तेव्हा महाराष्ट्रातील सिनेमागृहं कार्यान्वित झाली नव्हती. तरीही माझ्या टीमनं सिनेमा प्रदर्शित करण्याचा प्रयोग आणि प्रयत्न केला. आता महाराष्ट्रात ५० टक्के आसनक्षमतेनं सिनेमागृहं खुली झाली आहेत; तेव्हा आम्ही 'सूर्यवंशी' प्रदर्शित केला. आम्ही वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत सिनेमा घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आजही काही राज्यांमध्ये निम्म्या क्षमतेनंच सिनेमागृहं सुरू आहेत. रात्रीचे शो नाहीत. पण, आपण थांबायचं नाही. आपण आपलं कार्य, प्रयत्न सुरु ठेवायचं. लेखक महत्त्वाचामाझ्या मते सिनेमा त्याच्या कथेवर, पटकथेवरच चालतो. सिनेमात 'स्टारपॉवर नव्हे रायटर्स पॉवर' महत्त्वाची आहे. सर्वप्रथम कथा आणि पटकथा लेखक येतात आणि त्यानंतर दिग्दर्शक आणि कलाकार. सिनेमाचं सर्वाधिक श्रेय हे लेखकांचं असतं. माझ्यासाठी लेखक महत्त्वाचा आहे. मी आजवर दीडशेहून अधिक सिनेमे केले असेन; पण लेखकांनी हे सिनेमे लिहिलेच नसते तर आज जो अक्षयकुमार आहे तो दिसला असता का? लेखक हा माझ्यासाठी 'स्टार' आहे. महत्त्वाकांक्षी दिग्दर्शकमाझ्या 'सुहाग' या सिनेमाच्या वेळी रोहित शेट्टी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तो कधीच दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला नसतो. तो अत्यंत मेहनती आणि महत्त्वाकांक्षी दिग्दर्शक आहे. प्रत्येक सीनचं तो बारकाईनं आकलन करत असतो. सिनेमाच्या प्रत्येक प्रसंगाचा खोलवर विचार करणारे खूप कमी दिग्दर्शक असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे रोहित शेट्टी. तेव्हापासूनच त्याची काम करण्याची जिद्द मी बघत आलो आहे. प्रत्येक सिनेमागृहं सुरु व्हावंकरोनाकाळात अनेक सिंगल स्क्रीन सिनेमागृहं कायमस्वरूपी बंद झाली आहेत. पण, बंद झालेली सिनेमागृहं पुन्हा कार्यान्वित व्हावी अशी मी आशा करतो. सिनेमासंस्कृती आणि भारतातील सिनेमा व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी असं वाटत असेल तर प्रत्येक सिनेमागृहं कार्यान्वित व्हायला हवी. महाराष्ट्र राज्यासह देशभरातील इतर अनेक राज्य सरकार सिंगल स्क्रीन कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत; हे मी जाणतो. वेब सीरिजसुद्धा करणारवेब सीरीज हे माध्यम नक्कीच आकर्षित आहे. मीसुद्धा सीरिजमध्ये काम करणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात मी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. मराठीतही काम करेनमी मराठी सिनेमे पाहत असतो. अनेक मराठी कलाकार माझे मित्र आहेत. अनेकांबरोबर मी हिंदी सिनेमांमध्ये कामही केलं आहे. यापूर्वी मी '' या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. पुन्हा एखादी कथा आवडल्यास मराठी सिनेमाची निर्मिती नक्कीच करेन. पण अभिनयासाठी मला अद्याप कोणीही विचारलेलं नाही. एखादी छानशी भूमिका आणि उत्तम कथानक माझ्यापर्यंत आलं तर मी नक्की मराठी सिनेमात काम करेन. टक्कर होणारच दोन वर्षांपासून अनेक सिनेमे प्रदर्शनासाठी रखडले आहेत. सर्वच सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार नाहीत. बहुतांश चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे येत्या महिन्यांमध्ये सिनेमांची टक्कर होणारच आहे. पण, या सगळ्यात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ciMAKV